- आज १६२ जणांना कोरोनाची बाधा; ०४ जणांचा मृत्यु तर १०५ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. ०४ नोव्हेंबर) रोजी १६२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले दोन पुरुष व दोन स्त्री रुग्ण हे दापोडी (वय ८० वर्षे), कासारवाडी (वय ६२ वर्षे), जाधववाडी (वय ५८ वर्षे), थेरगाव (वय ५० वर्षे) येथील रहिवासी आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८८२९१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८४९५० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५३७ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.