न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून मोशीतील सेक्टर १२ येथे गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांच्या घरांसाठी येत्या काही दिवसांत अर्ज मागवणार आहे. येत्या आठवड्याभरात त्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्याचे काम ६ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सद्यःस्थितीत ४० टक्क्यापर्यंत काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती प्राधिकर णाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशाराणी पाटील यांनी दिली. सेक्टर क्रमांक १२ येथील पहिल्या टप्प्यात ४ हजार ८८३ घरे उभारली जाणार आहेत. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी १ बीएचके, तर अल्प उत्पन्न गटासाठी बीएचके सदनिकांचा समावेश आहे. या गृह प्रकल्पासा ठी रेरा अंर्तगत नोंदणी प्रलंबित होती. त्याची नोंदणी प्रक्रिया करण्यात आल्यानंतर आता या गृहप्रकल्पासाठी अर्ज मागविण्यात येणार आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया पार पडणे अपेक्षित होते; मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ते लांबणीवर पडले आहे. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील म्हणाल्या की, या गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील घरांसाठी ईडब्ल्यूएस आणि येथील एलआयजी प्रकारातील सदनिकांसाठी स्वतंत्र अर्ज मागविले जाणार आहेत. येत्या आठडाभरात त्याचे नियोजन करण्यात येणार आहे.