न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ नोव्हेंबर २०२०) :- विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरोधात सांगवी पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्याकडून मागील एक महिन्यात एक लाखाहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक राम पवार, हवालदार सुनील बोकड, विनायक डोळस, कर्मचारी मंगेश शिखरे, शेखर जावेद यांचे पथक कारवाई केली.
शहरात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनलॉकमध्ये नागरिकांचा बाजार, बैंका, कार्यालये आदी ठिकाणी नागरिकांचा वावर वाढत चालला आहे. पिंपळे गुरव येथे मास्क न घातल्यास पोलिसांकडून नागरिकांवर ५०० रुपये दंड आकारला जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्मचारी शासनाने घालून दिलेल्या विविध नियमानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी कर्मचारी करीत आहेत. शासनाच्या नियमानुसार विनामस्क फिरणाऱ्या, नागरिकांवर मागील एक-दोन महिन्यांपासून दंडात्मक कारवाई केली जात आहे. यापुढेही मोहीम अधिक तीव्र करणार आहे.