न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ०५ नोव्हेंबर) रोजी १३१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १२४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेली एक स्त्री रुग्ण ही चिंचवड (वय ७३ वर्षे) येथील रहिवासी आहे. तर हद्दीबाहेरील ७० वर्षीय पुरुष रुग्ण जुन्नर येथील रहिवाशी आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८८४२२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८५०७४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५३८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.


















