न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२०) :- स्पर्धेत टीकायचे असेल तर, आपल्या उत्पादकतात सतत सुधारणा करणे आवश्यक असते. त्याचबरोबर संस्थेचा पर्यायाने आपला स्वतःचा देखील फायदा कशामुळे करता येईल. याकडेकी लक्ष देणे आवश्यकच असते. उद्योग समूहाचा फायदा होण्यासाठी गुणवत्ता सुधारणे, उत्पादकता वाढविणे, होणारा खर्च कमी करणे व उपलब्ध साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडीया दरवर्षी विविध उद्योग समूहाच्या स्पर्धेच्या माध्यमातून वार्षिक अधिवेशन भरविले जातात.
क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडीयाच्या पुणे शाखेच्या वतीने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा ३५ वे वार्षिक अधिवेशन ऑनलाईन माध्यमाच्या स्वरुपात भरविण्यात आले. त्यात महाराष्ट्रातून ४० उद्योग संस्थांमधून ११२ संघांनी क्वॉलिटी सर्कल, कायझेन, लिंन क्वॉलिटी सर्कल, पोकायोके, सिक्ससिंग्मा, पोस्टर, कविता, निबंध या स्पर्धेत ३९२ स्पर्धकांचा समावेश होता. त्यात किर्लोस्कर ऑईल इंजिन्सच्या उत्कर्ष संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर, दुसरा डिओजिओ बारामतीच्या मॅकडॉवेल्स आणि तिसरा व्हिल्स इंडिया लिमिटेडच्या ईन्वेंन्शन संघ, चौथा क्रमांकासाठी चार उद्योग समूहांचा समावेश होता.
त्यात ल्यूमॅक्स ऍन्सिलरीचा अॅचिव्हर संघ, इलेक्ट्रोथर्म इंडीया लिमिटेडचा इन्वेन्शन संघ, गॅब्रिअल इंडीया लिमिटेडचा गॅब्रिअल इंजिनिअर्स संघ, हेन्ड्रिक्सन कंपनीचा सिंग्नीफिक्ट फीचर संघ तर, पाचवा क्रमांक थायसिन क्रुप इंडियाच्या श्री राव कायझेन या संघांना मिळावा एकूण सहभागी संघाच्या ८८ टक्के उद्योग समूहांना सुवर्णपदक व १२ टक्के उद्योग समूहांना रजत पदक मिळाले. स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या ११२ संघांनी आपापले प्रबंध सादरीकरण करतेवेळी विविध उद्योग समूहांनी एकूण २४ कोटी रुपयांची बचत केल्याचे यावेळी क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतिश काळोखे यांनी आवर्जुन सांगितले. ही बचत वस्तूनिर्मिती करताना वारंवार होणार्या खर्चाबाबत संशोधनातून निष्पन्न झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्पर्धेचे नियोजन व संयोजन क्वॉलिटी सर्कल ऑफ इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतिश काळोखे यांनी केले. तर, प्रकाश यार्दी, अरुण अडिवेरेकर, प्रशांत मराठे, रणजित जाधव आणि निखिला शिरोडकर यांनी परिक्षकांचे काम केले. क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडीयाच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदूलकर यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्यावर्षी विविध अडचणींवर मात करून ऑनलाईन वार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. फोरमचे चंद्रशेखर रुमाले आणि प्रशांत बोराटे यांनी अधिवेशन पार पडण्यासाठी मोलाची मदत केली. येत्या आठवड्याभरात क्यूसीएफ पुणे कार्यालयातून ट्रॉफी व प्रशस्तीपत्रके सन्मानपूर्वक वितरित करण्यात येणार आहे.