न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२०) :- कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला आहे. कामगार वर्ग चारही बाजूनी कोंडीत सापडला आहे. कामगार कपात, पगार कपात बेरोजगारी आदी प्रश्नांवर कामगारांची भूमिका मांडण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कामगार सेल कार्यकारणीची कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोशल डिस्टन्स व सर्व नियमांचे पालन करुन प्रभाग क्र. १४ मधील चिंचवड येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कामगारांना कौटुंबिक बाबतीत आधार देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांची फी भरण्याचा तगादा लावत आहे. याबाबत सर्व शाळांना निवेदन देऊन विद्यार्थीहितार्थ या प्रश्नावर कार्यरत राहणार आहे. तसेच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड येथील कामगार क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम जनहितार्थ राबविण्याचा मानस बैठकीत व्यक्त केला गेला. तसेच पदाधिका-यांसाठी विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन आदी विषयावर चर्चा झाली.
बैठकीसाठी कामगार सेलचे अध्यक्ष किरण चंद्रकांत देशमुख, सुदाम शिंदे, राकेश चौधरी, प्रफुल्ल शिंदे, संतोष शिंदे, दिपक गायकवाड, शिवाजी वालवणकर, आकाश पालकर, अविनाश घोगरे, संदिप शिंदे शंकर जाधव, दिपक मोंडोंकार आदी उपस्थित होते.