न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पालिकेतील दालनात शहरातील सर्व विद्युतदाहिनी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन व घंटागाडी कर्मचारी यांच्या बोनसबाबत बैठक पार पाडली.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूण ३१ स्मशानभूमी सध्या आहे. तसेच स्मशानभूमीमध्ये विद्युतदाहिनी ऑपरेटर, सफाई सेवक, रखवालदार, सुरक्षा रक्षक वा तत्सम कर्मचारी कार्यरत आहे. सदरच्या कर्मचारी यांना संबंधित ठेकेदाराकडून मासिक वेतन १३,००० /- अदा केले जाते. कर्मचारी यांचे खात्यात कपात करुन एकूण उर्वरीत रक्कम रुपये १२,०३७/- रुपये अदा केले जाते.
महानगरपालिका व ठेकेदार यांनी केलेल्या वेतन कराराचा भंग होत असून त्वरीत किमान वेतन पुर्वलक्षी प्रभावाने अदा करण्यात यावा व शासनाच्या धोरणानुसार मनपाच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील विद्युत दाहीनीतील सर्व कार्यरत असलेल्या कर्मचारी यांना किमान वेतन तातडीने अदा करण्यात यावे. तसेच कोविड-१९ विषाणूच्या काळामध्ये तेथील कर्मचा-यानी रात्रदिवस नागरीकांची सेवा केलेली आहे. त्या अन्वये मनपा मार्फत नियमानुसार कोविड-१९ चा भत्ता देखील सर्व कर्मचारी यांनी नियमानुसार अदा करण्यात यावा. तसेच विद्युत दाहीनी मधील सर्व कर्मचारी गेले २० वर्षापासून कामकाज करीत आहे. तरी त्यांना महानगरपालिकेमध्ये कायमस्वरुपी कर्मचारी म्हणून कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना प्रशासनास देण्यात आल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत कार्यरत असलेले घंटागाडी कर्मचारी यांना र. रुपये ३०,०००/- इतका बोनस अदा करणेबाबत मा. आयुक्त यांच्या दालनात समक्ष भेटून तातडीने आदेश पारीत करणेबाबत संबधित विभागास सूचना दिल्या व मा. आयुक्त साहेब यांनी घंटागाडी कर्मचारी बोनसच्या आदेशावर स्वाक्षरी करुन आदेश पारीत केले.


















