- ७६ जणांना कोरोनाची बाधा; ४०९ कोरोनमुक्त तर, एकाचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. ०९ नोव्हेंबर) रोजी ७६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आकुर्डी येथील एका ६६ वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८८८७८ वर पोहोचली आहे.
शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८५८८४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५४७ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.


















