- कचरा डेपोतील त्या सफाई कर्मचाऱ्याकडून माणुसकीची थाप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात घंटागाडीने कचरा गोळा करण्यात येतो. तो मोशी येथील कचरा डेपोत खाली करण्यात येतो. रविवारी एका महिलेने पाच ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने एका पर्ससह कचऱ्यात गेल्याचं सांगितलं.
संबंधित महिलेकडून दिवाळीनिमित्त घरातील सफाईचे काम सुरू होते. तेव्हा, काही विचार न करता ती पर्स वापरातील नसल्याने तशीच कचऱ्यात टाकून दिली. नंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला.
याची माहिती मोशी येथील कचरा डेपोतील सफाई कर्मचारी हेमंत लखन यांना देण्यात आली. संबंधित महिलेला समक्ष बोलवून १८ टन कचऱ्यातून महिलेची पर्स शोधून त्यातील पाच ग्रॅम सोन्याचे पेंडल आणि चांदीचे जोडवे त्यांना परत केले.


















