- विधायक उपक्रमांनी करणार वाढदिवस साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) :- भोसरी विधानसभेचे आमदार तथा भाजपा भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम घेतले जात आहेत. आपला वाढदिवस गोरगरीब, अनाथाना सहकार्य करून साजरा करावा, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचे कट्टर समर्थक उद्योजक संतोष बारणे यांनी चिखली, दिघी आणि पांजरपोळ येथील अनाथ आणि दिव्यांग मुलांना अत्यावश्यक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक संतोष बारणे यांच्यातर्फे दरवर्षी वाढदिवसानिमित्त विविध आदर्श उपक्रम घेतले जातात. यंदाचा वाढदिवस गोरगरीब, अनाथांना सहकार्य करून करावा, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेऊन कार्यकर्ते, समर्थकांना आवाहन केले आहे. त्यानुसार वाढदिवसाचे नियोजन आणि कार्यक्रम घेतले जात आहेत. येत्या २८ नोव्हेंबर रोजी चिखली येथील विकास अनाथ आश्रम, दिघी येथील अनाथ आश्रम आणि पांजरपोळ येथील दिव्यांगाना अत्यावश्यक साहित्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे यांनी दिली.