न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील शाहूनगर, संभाजी नगर, एच.डी.एफ.सी कॉलनी परिसरासाठी एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशन, निगडी पोलिस स्टेशन व चिखली पोलिस स्टेशन इत्यादी पोलिस स्टेशनची हद्द आहे.
तसेच प्रभाग क्रमांक १० मधील नागरीकांना एम. आय.डी.सी. पोलिस स्टेशन व निगडी पोलिस स्टेशनला जाण्यासाठी जादाचे अंतर असल्याने तसेच नागरीकांना कोणत्या पोलिस स्टेशन अंतर्गत आपण येतो हे समजत नसल्याने नागरीकांना नाहक फिरावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक त्रास होत आहे.
तसेच जवळचे चिखली पोलिस स्टेशन असताना नागरीकांना दुरवर जावे लागत आहे, तरी नागरीकांच्या सततच्या मागणीवरुन व सोयीसाठी प्रभाग क्रमांक १० मधील शाहूनगर, संभाजीनगर, एच.डी.एफ.सी कॉलनीमधील नागरीकांसाठी चिखली पोलिस स्टेशन अंतर्गत हदद करण्यात यावी, अशी मागणी उपमहापौर केशव घोळवे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.