- पालिकेच्या “स्मार्ट सिटी”त सत्ताधारी भाजपचा स्मार्ट भ्रष्टाचार..
- शिवसेनेचा सत्ताधारी भाजपसह प्रशासनावर हल्लाबोल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “स्मार्ट सिटी”त सत्ताधारी भाजपने स्मार्ट भ्रष्टाचार केला आहे. ५२० कोटींच्या टेंडरमध्ये तब्बल ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. यात सत्ताधारी आमदार, स्मार्ट सिटी संचालक व त्यांची पाठराखण करणारे भाजप धार्जिणे आयुक्त आणि प्रशासन सहभागी आहे, असा आरोप शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केला आहे. माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकरणी त्यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.
माहिती देताना ते म्हणाले की, PCSCL(पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीली.) टेंडर क्र.८ दि०९/१०/२०१९, ( Selection of SYSTEM INTEGRATOR for Supply, Installation, Testing, Commissioning and O&M for ICT led PCSCL Smart City Solutions) या५२० कोटी रु. चेटेंडर,SYSTEM INTEGRATOR म्हणूनTech Mahindra Co. Ltd. , Krystal Integrated Services Pvt. Ltd., ArceusInfotechPvt. Ltd याConsortium चीLead Bidders म्हणूननिवड करण्यात आली. १५ मे २०१९ रोजी याConsortium बरोबर PCSCL (पिं. चिं. स्मार्ट सिटी लि.) नेSYSTEM INTEGRATOR म्हणून ५२० कोटीचे कामांचेMaster Service Agreement ( यापुढे MSA म्हणून उल्लेख) केले आहे. या SYSTEM INTEGRATOR द्वारे करण्यात येणाऱ्या कामांमध्येमोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असूनPCSCL ची किमान २५० ते ३०० कोटी रुपयांची फसवणूक या टेंडरद्वारे होणार आहे. या टेंडरमध्ये SYSTEM INTEGRATOR सोबत सत्ताधारी भ.ज.पा आमदार, स्मार्ट सिटी संचालक त्यांची पाठराखण करणारे भाजप धार्जिणे आयुक्त आणि प्रशासन सहभागी आहेत.
PCSCL कडून MSA मध्ये ज्या कामाचे ९.७० कोटी रुपये खर्च दाखविण्यात आला आहे ते काम SYSTEM INTEGRATOR आणि त्याचा Sub Contractor अधिकृत पुरवठादार AdeptFluidynePvt. Ltd. यांना २ कोटी ५३ लाख (टॅक्स सहित) रुपयात करण्यास भाग पाडत होते. या एकाच कामामध्ये ७.२० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. Krystal Integrated Services Pvt. Ltd., तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीचा Smart City Solutions शी संबंध काय ? त्यांच्या सह्भागामध्ये कुणाचा हात ? त्यांचा सहभाग कोणते SMART कामकरण्यासाठी? Field Infrastructure : Advance Water Metering Applicationया कामासाठी SYSTEM INTEGRATOR द्वारे MSA मध्ये अधिकृत पुरवठादार म्हणून AdeptFluidynePvt. Ltd. या कंपनी चा समावेशकेल्यानंतर, ठरलेल्या किमतीत आणि वेळेत काम करण्याची तयारी असताना त्यांचे कामकाकाढून घेण्यात आले ? LIVE FIBRE PVT. LTD. या कंपनीला बेकायदेशीररित्या काम SubContract कसे करण्यात आले? PCSCL ची परवानगी घेण्यात आली आहे का ? पिं. चिं. महापालिकेचे आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे सी.ई.ओ श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली १० सप्टेंबर’२०२० रोजी झालेल्या बैठकीत AdeptFluidynePvt. Ltd. यांना पुरवठादार म्हणून हटविण्यात आले. पिं. चिं. महापालिकेचे आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे सी.ई.ओ श्रावण हर्डीकर आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने पुढील गोष्टींचा खुलासा करावा.
System Integrator शी ठरलेल्या किमतीत आणि मानकांप्रमाणे पुरवठा करण्याची तयारी असताना AdeptFluidynePvt. Ltd. नेWork Orderका नाकारली ? त्यांचे म्हणणे का ऐकून घेण्यात आले नाही ? LIVE FIBRE PVT. LTD. याकंपनीचा प्रतिनिधी या बैठकीस कोणत्या अधिकाराने उपस्थित होता ? System Integrator ला आर्थिक फायदा व्हावा या साठी AdeptFluidynePvt. Ltd. यांना बदलण्यात आले का ? या आर्थिक फायद्याचे कोण कोण वाटेकरी आहेत ते आयुक्तांनी जाहीर करावे, असेही त्यांनी म्हटले.
याबाबतचे निवेदन एकनाथ शिंदे (नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांचेकडे देण्यात आले असून, PCSCL(पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीली.) टेंडर क्र.८ दि०९/१०/२०१९, हे ५२० कोटी रु. चे टेंडर त्वरित स्थगित करून, टेंडर मधील भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी आणि दोषींवर फौजदारी कारवाई करणेची मागणी शिवसेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आली आहे. मंत्री महोदयांनी खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत, असे बाबर यांनी म्हटले.