न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) रोजी १८३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दहा जणांचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९१०३८ वर पोहोचली आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष आकुर्डी (५७ वर्षे), थेरगांव (८४ वर्षे), भोसरी (५२ वर्षे) ०२ स्त्री चिंचवड (७३ वर्षे), थेरगांव (६५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष रुग्ण खेड (७४ वर्षे), सोलापूर (८० वर्षे), नारायणगांव (५९ वर्षे), पारनेर (८१ वर्षे), ०१ स्त्री – जुन्नर (५० वर्षे) येथील रहिवासी आहेत. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८७४६१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५९६ जणांचा मृत्यू झालेला आहे.