न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२०) :- बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला धक्का बुक्की करण्यात आली. ही घटना पिंपरीतील निराधारनगर झोपडपट्टी येथे रविवारी (दि. २२) रात्री घडली. विष्णू सुभाष सूळ (वय ३२, रा. नढेनगर, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पिंपरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी विष्णू गौतम भारती यांनी सोमवारी (दि. २३) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निराधारनगर, पिंपरी येथे एकजण दारूविक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून अडीच हजार रुपये किंमतीची ३५ लिटर दारू हस्तगत केली. मात्र या कारवाईला आरोपी सूळ याने विरोध केला. मी एकटाच दारू विक्री करतो का, असे म्हणत त्यांने पोलिसांशी झटापट करीत हुज्जत घातली होती.