न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने ‘ हरित सेतू ‘ प्रकल्पासाठी नागरिकांकडून शुक्रवारपर्यंत (दि. २०) सूचना व नावीन्यपूर्ण संकल्पना मागविल्या होत्या. त्याला शहरातील ८६ नागरिकांनी प्रतिसाद दिला असून, विविध सूचना व संकल्पना त्यांनी मांडल्या आहेत.
शहरातील पालिकेची १८४ उद्याने व राखीव उद्याने (हिरवी क्षेत्र) पदपथ व सायकल ट्रॅकने एकमेकांशी जोडण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्या माध्यमातून शहरात हिरव्या मोकळ्या जागांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. त्यात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी पालिकेने त्यांच्या सूचना व नाविण्यपूर्ण संकल्पना २० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन माध्यमातून मागविल्या मागविल्या होत्या.
त्यात एकूण ८६ नागरिकांनी सहभाग घेतला असून, विविध सूचना पाठविल्या आहेत. त्या सूचनांचे तज्ज्ञांकडून मूल्यांकन केले जाणार आहे. उत्तम कल्पनांची अमंलबजावणी केली जाणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, शहरी नियोजन अधिकारी, डिझाइनर, स्वंयसेवी संस्था यांच्या सहभागातून हरित सेतू उपक्रमाची मूलभूत रचना या कार्यशाळेत तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या शुक्रवारी (दि. २७) पालिकेचे अधिकारी व तज्ज्ञांची बैठक आयोजित केली आहे. तसेच, नागरिक व नगरसेवकांकडून पुढील टप्प्यातही सूचना मागविल्या जाणार आहेत, असे महापालिकेचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.


















