न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२०) :- पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कामासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यात मुख्य लिपिक, लिपिक, मेडिकल ऑफिसर, शिपाई आशा सेविका आदींचा समावेश आहे. निवडणुकीसाठी मतदान मंगळवारी (दि. १) होणार आहे. त्यानंतर मतमोजणी आहे.
या निवडणुकविषयक कामासाठी या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवारी (दि. २७) पुण्यातील गणेश कला मंच येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवडणुक कामासाठी कर्मचारी गेल्याने पालिकेच्या अनेक विभागात शुकशुकाट पसरला आहे. परिणामी, कामे ठप्प झाली आहेत.