न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ३० नोव्हेंबर) रोजी १७२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९२३३१ वर पोहोचली आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०१ स्त्री – दापोडी (६१ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी-चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरूष – हिंजवडी (५० वर्षे) येथील रहिवासी आहेत. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८८३५७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १६२९ जणांचा मृत्यू झालेला आहे.