- चौथ्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२०) :- केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेच्या तिसऱ्या टप्यात सहभागी होऊनही राज्यस्तरीय गुणांकनात पिंपरी चिंचवड शहर अग्रभागी राहिले आहे. चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. केंद्र सरकारच्यावतीने स्मार्ट सिटी योजना सुरू करण्यात आली. त्यात पिंपरी – चिंचवड शहराचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला. तरीही गुणांकनात अग्रभागी आहे.
स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने राज्यस्तरीय यादी जाहीर केली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पांची संख्या, चालू प्रकल्प, निविदा टप्प्यातील प्रकल्प, डीपीआर टप्प्यातील प्रकल्प आणि वापरलेल्या निधीची रक्कम याचा आधार घेऊन ही रैकिंग देण्यात आली.
कोरोना काळातही शहरात स्मार्ट सिटीची कामे चालू होती. पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या वतीने विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. त्यामुळे राज्यातील नऊ शहरांत उद्योगनगरी आघाडीवर आहे. त्यामुळे राज्यातील नऊ शहरांमध्ये पिंपरी चिंचवड दुसऱ्या नंबरवर आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत कामांसाठी साडेतीनशे कोटींच्या आसपास खर्च झाला आहे.