न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२०) :- दापोडी येथे बिनधास्त होऊन काही जणांच्या टोळक्याने कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचं समोर आले आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ समोर आला असून भोसरी पोलीस बर्थडे बॉयचा शोध घेत आहेत.
सोहेलचा वाढदिवस असल्याने मित्र समीर याने सर्व नियोजन केले होते. त्यानुसार ठीक बाराच्या सुमारास सोहेलने काही मित्राच्या उपस्थित कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी सोहेल आणि समीर हे दोघे ही कोयत्याने अक्षरशः केकचे तुकडे करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
केक कापून झाल्यानंतर कोयता दापोडीच्या बस स्थानकात लपवून ठेवण्यात आला. भोसरी पोलिसांनी उशिराने कारवाईला सुरुवात केली. यावेळी समीरला शोधण्यात त्यांना यश आले आहे. इतर मात्र फरार झाले आहेत. सध्या पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.















