- वाहतुकीसह पिंपरीतील मुख्य बाजारपेठ जोमाने सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२०) :- कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरयाणा येथील शेतकऱ्यांचे दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू असून आज ‘भारत बंद’ ची हाक त्यांनी दिली आहे. त्याला अवघ्या देशातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात या बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत काही प्रमाणात दुकाने बंद आहेत. तर इतर ठिकाणी दुकाने सुरू असल्याचं चित्र आहे. ऐकून पाहता शेतकऱ्यांच्या भारत बंद ला शहरातून संमिश्र प्रतिसाद आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्वपक्षीय आणि कामगार संघटनांनी एकदिवसीय आंदोलन केलं.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. सर्वपक्षीय आणि काही संघटना आंदोलन करत आहेत. मंगळवारी पिंपरीतील मुख्य बाजारपेठ बंद असते मात्र आज मोठ्या प्रमाणावर दुकानदारांनी दुकाने उघडली आहेत. शहरातील वाहतूक देखील सुरळीत असून शहरातील मुख्य चौकातील वाहतूक वळवण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरीत १२० पोलीस कर्मचारी, दहा अधिकारी, एसआरपी तुकडी, आरसीपी ची तुकडी तैनात करण्यात आली होती.















