- आंदोलनात शेतकरी नाहीच, तीनशे रुपये रोजाने पुरविलेल्या लोकांचा भरणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२०) :- डिसेंबरच्या थंडीने जोर धरला असतानाही पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी दिल्लीच्या सीमेजवळ आंदोलनासाठी रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आम्ही हटणार नाही, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. अनेक महिने आम्हाला रस्त्यावर रहावं लागलं तरी, आम्ही तयार आहोत असं हे शेतकरी सांगत आहेत.
असे असताना पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी अकलेचे तारे तोडत, दिल्लीतील आंदोलन हे फसवे असून आंदोलनातील आंदोलक हे शेतकरी नसून ३०० रुपये देऊन भाड्याने आंदोलनात सामील केले असल्याचे वक्तव्य केले. तसेच या आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानकडून रसद पुरविली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची आज सर्वसाधरण सभा होती. या सभेत विरोधी नगरसेवकांनी शेतकरी आंदोलनास पाठींबा देत मोदी सरकारचा निषेध केला. देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी सभा तहकुबीची मागणी केली. यावर बोलताना उपमहापौर केशव घोळवे यांनी सभेत वरील वक्तव्य केले.















