- पिंपरी – चिंचवड महापालिकेकडून पोलीस चौकीत गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२०) :- अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी पिंपरी – चिंचवड महापालिकेकडून तक्रार केली आहे. त्यानुसार बांधकाम करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या अनिता चंद्रशेखर तिवारी ( वय ४५ , रा . आदर्शनगर , मोशी ) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या प्रकरणात रमेशकुमार राम सामुझ मिश्रा ( वय ४७ , रा . आदर्शनगर , मोशी ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणात महापालिकेचे उपअभियंता हेमंत प्रभाकर देसाई ( वय ४७ ) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींनी बांधकाम करण्यासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नाही. महापालिकेने त्यांना नोटीस बजावली असता आरोपींनी त्यांचे अनधिकृत बांधकाम काढले नाही. त्यामुळे गुन्हा दाखल केला आहे.