- भाजपच्या आधीच उरकले निगडीतील भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाचे उद्या गुरुवारी सत्ताधारी भाजपच्या वतीने महापौर माई ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने निमंत्रण पत्रिकादेखील मान्यवरांना पाठविल्या आहेत.
त्याआधीच शहर राष्ट्रवादीने आज गुरुवारी उड्डाणपुलाचे उद्घाटन करून सत्ताधारी भाजपला जोरदार चपराक दिली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेविका सुमनताई पवळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, विशाल काळभोर, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.