- खुर्चीला शेतीफळांचा हार घालून व्यक्त केला जाहीर निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी अकलेचे तारे तोडत, दिल्लीतील आंदोलन हे फसवे असून आंदोलनातील आंदोलक हे शेतकरी नसून ३०० रुपये देऊन भाड्याने आंदोलनात सामील केले असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच या आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानकडून रसद पुरविली जात असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत म्हटले होते.
या वक्तव्याचा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीने खरपूस समाचार घेत उपमहापौर घोळवे यांच्या दालनातील खुर्चीला जय जवान… जय किसान…, किसान एकता जिंदाबाद.. अशा घोषणा देत शेतीफळांचा हार घालून जाहीर निषेध व्यक्त केला.
जोपर्यंत माफी मागितली जात नाही, तोपर्यंत घोळवे यांना महापालिकेत पाय ठेवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा पालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी घेतला आहे. यावेळी नगरसेवक मयूर कलाटे व नगरसेवक उपस्थित होते.