- आज १६७ जणांना कोरोनाची बाधा; २८१ रुग्णांना डिस्चार्ज तर, ४ रुग्णांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. ९ डिसेंबर) रोजी १६७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९३८१४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९०१७९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७१० जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – काळेवाडी (४३ वर्षे), पिंपरी (५५ वर्षे) ०१ स्त्री – कासारवाडी (३४ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेली १ स्त्री रुग्ण ही जुन्नर (३५ वर्षे) येथील रहिवासी आहे.


















