- त्या कामांच्या वर्कऑर्डरचा मार्ग मोकळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरातील वाकड ताथवडे प्रभाग क्रमांक २५ येथील रस्ते कामांच्या सुमारे ५१ कोटी खर्चाच्या प्रस्ताव सत्ताधारी भाजपने स्थायी समितीमध्ये फेटाळून लावला. मात्र, राज्य शासनाने समितीचा तो ठराव पूर्णपणे विखंडित केल्याचा अंतिम निर्णय नुकताच घेतला आहे.
त्यामुळे कामांची वर्कऑर्डर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा सत्ताधारी भाजपला मोठा न झटका आहे. शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक राहुल कलाटे प्रभाग क्रमांक २५ चे प्रभागातील प्रतिनिधीत्व करतात. ताथवडेतील जीवननगरकडून मुंबई- बंगळुरू महामार्गाकडे जाणाऱ्या विकास आराखड्यातील २४ मीटर रुंद रस्ता विकसित करण्यासाठी २० व कोटी ३३ लाख आणि प्रभागातील रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी ३० कोटी ६९ लाख असे एकूण ५१ कोटी २ लाख खर्चाचे दोन प्रस्ताव आयक्त श्रावण हर्डीकर यांनी २६ ऑगस्टला स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवले होते.
कोरोना संकटकाळात पालिकेचे उत्पन्न घटलेले असताना एकाच प्रभागात १०० कोटींपेक्षा अधिक रकमेची कामे होत असल्याने सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी त्या दोन कामांना कडाडून विरोध केला. मतदान घेऊन हे दोन्ही प्रस्ताव बहुमतांच्या जोरावर ना फेटाळून दप्तरी दाखल करण्यात आले. त्या विरोधात शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी राज्याच्या नगरसचिव खात्याकडे दप्तरी तक्रार केली. त्यावर नगरसचिव खात्याने आयुक्त हर्डीकर यांच्याकडे ३० दिवसांच्या आत अभिप्राय मागितला होता.


















