- पोलिसांनी दोन किलो गांजासह ६० हजार किमतीचा ऐवज केला जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२०) :- चिंचवड एमआयडीसी मधील मोहननगर येथे जय महाकाल पान टपरीमधून गांजा विक्री केला जात असल्याची माहिती पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी टपरीवर छापा मारून टपरीमधून दोन किलो ११९ ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण ६० हजार ५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. ९) दुपारी पावणे सहा वाजता मोहननगर येथील जय महाकाल पानटपरी येथे करण्यात आली.
आकाश शिवाजी सरगर (वय २७, रा. दातीर चाळ, चिंचवड), सतीश पांडुरंग डोईफोडे (वय ४०, रा. आकुर्डी गावठाण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार बाळासाहेब माधवराव सूर्यवंशी यांनी पिपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.


















