- भटक्या श्वानांसाठी भोसरीत डॉग रिस्क्यू सेंटरची तातडीने उभारणी करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत असताना शहरातील लहान मुले, विद्यार्थी, माता भगिनी व जेष्ठ नागरीक यांना भटक्या व मोकाट श्वानांचा खुप मोठा त्रास होत आहे. त्यामुळे शहरातील नागरीक त्रस्त झालेले आहेत.
अनेक श्वान आजारी असतात. रस्त्यावरील दुचाकी व चारचाकी अपघातांमध्ये प्राण गमावतात. वाहन चालकांना देखील गंभीर ईजा पोहचवतात. अशा घटना वारंवार होत आहेत. परंतु महानगरपालिकेडून अद्यापपर्यंत कोणतेही धोरण ठरविलेले नाही.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भटक्या श्वानांची संख्या झपाटयाने वाढत असून, त्यामुळे सामान्य नागरीकांना भटक्या श्वानांचा चावण्याचा धोका व त्रास सतत होत आहे. तसेच भटक्या श्वानांवर उपाय म्हणून सदगुरुनगर, जुना कचरा डेपो, भोसरी येथे पर्यायी जागा उपलब्ध असून त्या जागेवर शहरामधील भटक्या श्वानांसाठी डॉग रिस्क्यू सेंटर तातडीने स्थापन करण्यात यावे. नागरीकांना होणा-या त्रासामधून वाचवावे, असे निवेदन उपमहापौर केशव घोळवे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.


















