न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. १० डिसेंबर) रोजी ११४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९३९२८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९०४७३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७११ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेला १ पुरुष रुग्ण हा चिंचवड (७३ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेला १ पुरुष रुग्ण हा धनकवडी (७१ वर्षे) येथील रहिवासी आहे.


















