- पिंपरी चिंचवड पालिकेकडून १८२,११ कोटींचा मिळकत कर गोळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२०) :- कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना राज्यातील महापालिकांनाही करावा लागत असून मिळकत कराची वसुली करण्यात राज्यातील २६ महापालिकांच्या नाकी नऊ आले आहेत. याकाळात १२०० कोटींचा सर्वाधिक मिळकत कर पुणे महापालिकेने तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेने १८२,११ कोटींचा मिळकत कर गोळा केला आहे.
आर्थिक राजधानी मुंबईला पुण्याने यंदा मागे टाकले आहे. आठ महापालिकांचे उत्पन्न २० कोटींच्या आतच असून पाच महापालिकांना एक रुपयाची वसुली करता आलेली नसल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे शासकीय यंत्रणांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. ऐन मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या कोरोनाच्या प्रादुभावामुळे नव्या आर्थिक वर्षाला फटका बसला. याला राज्यातील महापालिका अपवाद ठरल्या नाहीत. राज्यामधील महापालिकांचे यंदाचे उत्पन्न पाहिले असता मोठा आर्थिक फटका बसल्याचे आकडेवारीवरुन दिसते आहे.
राज्यातील मुंबई ५५१.५८, ठाणे २३१.५४, कल्याण – डोंबिवली १९३.६२, नवी मुंबई १४६,०३, नागपुर ११४.३३, नांदेड ११३.८३, वसई-विरार ७९.९१, नाशिक ५६.५९, सोलापूर ३९,५६ कोटी या महापालिकांनी मिळकत कर गोळा केला आहे.