- फाैजदारी कारवाईचे स्पष्ट संकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य, उद्यान, बीआरटीएस, ईडब्लूएस प्रकल्पातील १०७ कामांमध्ये PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) आणि FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) बोगस आढळून आले आहेत. त्यातील १८ ठेकेदारांवर फाैजदारी कारवाई करुन त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी सभापती संतोष लोंढे यांनी पत्रकारांना दिली.
महापालिकेच्या विविध कामे घेताना सन २०१८ -१९, २०१९-२०, डिसेंबर २०२० आजअखेर या तीन वर्षातील त्या ठेकेदारांनी PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) आणि महापालिकेला दिलेले FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) बोगस आढळून आले आहेत.
११ % पेक्षा कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी PSD (पर्फोर्मंस सेक्युरीटी डिपॉझिट) आणि मनपास दिलेले अनेक FDR (फिक्स डिपॉझिट रिसीट) खोटे निघाले. त्यामुळे प्रत्येक विभागाकडून बॅंकाकडे एफडीआरची खातरजमा करण्यात येत आहे. एकूण १०७ कामांमध्ये २४ कोटी रुपयांचे बोगस एफडीआर आणि पीएसडी आढळून आले आहेत. त्या १८ ठेकेदारांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.














