न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२०) :- मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करणाऱ्या सावत्र बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत सांगवी परिसरात घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईन सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी ४३ वर्षीय सावत्र बापावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा दुसरा पती आहे. फिर्यादी यांना पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला, मुलीने आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास सांगवी पोलिस करीत आहे.














