न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२०) :- प्राधिकरणातील सेक्टर १२ मधील अल्प उत्पन्न गट (एलआयजी) अंतर्गत १ हजार ५६६ सदनिका उभारण्यात येणार आहेत. त्यातील फेज १ मधील घरांचे उद्घाटन येत्या आठवडाभरात करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सोडत ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे. त्यासाठी उत्पन्नाची अट ३ ते ६ लाखापर्यंत असणार आहे.
या सदनिकांचे कार्पेट क्षेत्रफळ ५९.२६ चौरस मीटर असणार आहे. दरम्यान, या प्रकल्पातील इमारत पार्किंग आधिक ११ मजली राहणार आहे. मुबलक पार्किंग, १५ व १२ मीटरचे रस्ते, ७ मोकळ्या जागांमध्ये क्रीडांगणे, क्लबहाऊस, लॅन्ड स्केपिंग करण्यात येणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील १ हजार ५६६ घरांचे उद्घाटन येत्या आठवडाभरात होणार असून, डिसेंबरअखेर घरांचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.














