- दिवंगत माजी विरोधी पक्षनेते कै. दत्ता काका साने यांच्या चिरंजीवावर मोठी जबाबदारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी दिवंगत माजी विरोधी पक्षनेते कै. दत्ता काका साने यांचे चिरंजीव यश साने यांची पक्षाने निवड केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. मी शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत राहून त्यांचा आदर करून, पक्षाला उंचावर नेण्याचे काम करत राहील, असे गौरवोद्गार यश साने यांनी काढले.














