- दोन्ही मुलींचे अपहरण; आरोपींना बेड्या, निगडीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२०) :- “निगडी परिसरात अल्पवयीन मुलीवर आरोपी आशिष आनंद सरोदे याने लौंगिक अत्याचार केला. तसंच, तिच्यासोबत असलेल्या मावस बहिणीचा आरोपीचा मित्र करण भैरवनाथ साबळे याने विनयभंग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. दोन्ही आरोपींनी इतर तीन मित्रांना बोलावून आपापसात कट रचून दोन्ही मुलींचे अल्टो मोटारीतून अपहरण करून चिंचवड येथे नेल्याचं पीडितने सांगितलं आहे”.
पीडित मुलींनी घऱी गेल्यानंतर कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. ही घटना मंगळवारी रात्री घडली असून बुधवारी उशिरा उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने निगडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पीडित मुली मंगळवारी रात्री (दि. १५) नातेवाईकाकडे जेवणासाठी गेल्या होत्या. त्यानंतर घरी परतत असताना त्यांना ओळखीचे करण आणि आशिष भेटले. त्यांनी जवळच भटकंती करु असे सांगून अजंठानगर मधील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तेथे आशिषने एका मुलीवर बलात्कार केला. तर, करणने तिच्या मावस बहिणीचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपींनी आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. पीडित मुलींना मोटारकारमध्ये बसवून चिंचवड स्टेशन परिसरात रात्रभर बसविले. बुधवारी सकाळी पीडित मुलींना सोडल्यानंतर ही घटना उजेडात आली.
या प्रकरणी करण भैरवनाथ साबळे (२१), आशिष आनंद सरोदे (२०), निवास संजय सुतार (२०) , तेजस राजू वाघमारे (१९), कार्तिक उर्फ टिंक्या राजकुमार चव्हाण (२१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी निगडी पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.














