- पंधरा दिवसात वाढीव बांधकाम हटविण्याचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२०) :- थेरगाव येथील सर्व्हे नं १४ मधील समर्थ गायत्री इमारतीतील दोन मजले अनधिकृत असून याप्रकरणी महापालिकेने शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुतण्यास नोटीस बजावली आहे.
पिपरी – चिंचवड महापालिका अधिनियम कलम २६० प्रमाणे महापालिकेची बांधकाम परवानगी न घेता बिगर परवाना अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने गुजरनगर येथील समर्थ गायत्री प्रॉपर्टी प्रकल्पास नोटीस दिली आहे. त्यातील बारावा मजला अनधिकृत आहे, असे म्हटले असून, संबंधित बांधकाम पंधरा दिवसाच्या आत काढून टाकावे, असे नोटीशीत नमूद केले आहे. या प्रकल्पाचे संचालक महेश बारणे यांना नोटीस दिली असून, खासदार बारणे यांचे ते पुतणे आहेत.















