न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १९ डिसेंबर) रोजी १६१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९५२३१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१७८४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७३४ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेला एक पुरुष निगडी ६२ वर्ष येथील रहिवासी आहे.











