न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२०) :- पिस्टल व जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. १८) दिघीतील मॅगझिन चौकात ही कारवाई करण्यात आली.
प्रणव सुरेश कांबळे (वय २१, रा. गुरुदेव नगर, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक आशिष ज्ञानदेव बनकर यांनी दिधी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अटक आरोपीने ३० हजार किंमतीचे विनापरवाना एक लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतूस जवळ बाळगले होते. पोलिसांनी आर्म अॅक्ट कलमाखाली त्याला ताब्यात घेतले आहे.


















