- दुचाकीचोरांना नाही पोलिसांना भय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२०) :- शहराच्या विविध भागातून नऊ दुचाकी वाहने चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत सोमवारी (दि. २१) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साईनाथ हॉस्पिटल भोसरी येथून एक मोपेड दुचाकी एमएच – १२ – सीजी -५५७४ चोरट्यांनी २० डिसेंबर रोजी दुपारी बारा ते चार वाजताच्या कालावधीत चोरून नेली. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात महेश अर्जुन भागवत ( वय २७ , रा . सुसगाव ) यांनी फिर्याद दिली आहे.
लांडेवाडी भोसरी येथील अॅम्फेनॉईल इंडिया प्रा ली या कंपनीसमोरून १९ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी अडीच या कालावधीत दुचाकी एमएच १४ – ईके -७८७५ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पृथ्वीराज पांडुरंग देशमुख (वय २६, रा. बो-हाडेवाडी, मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सलीम पिरीमहमद सय्यद (वय ५१, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार देशमुख यांची एमएच – १४ – डीजी -४३२६ ही दुचाकी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरून नेली.
वाहन चोरीच्या चौथ्या गुन्ह्यात शरद जिजाभाऊ जठार (वय ३३, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जठार यांची रॉयल इन्फिल्ड बुलेट एमएच – १४ जीपी -००४३ दिघी रोडवरील समाधान हॉटेल समोरून चोरून नेली. मोहम्मद सुलेमान घांची (वय ३०, रा. चिंचवड) यांनी वाहन चोरीच्या पाचव्या गुन्ह्यात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची सीबीझेड दुचाकी एमएच – १४ – बीझेड -१५४२ अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. वाहन चोरीच्या सहाव्या गुन्ह्यात अविनाश साहेबराव दौंडकर (वय ३२, रा. दौंडकरवाडी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांची दुचाकी एमएच – १२ – जेएच – ९९९ ५ च-होली खुर्द येथील एका इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे. वाहन चोरीच्या सातव्या गुन्ह्यात विशाल आनंद कुलकर्णी (वय ३९, रा. कुमठा नाका, सोलापूर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात त्याच्या सीबीझेड दुचाकी चोरीबाबत फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी त्यांची दुचाकी एमएच – १५ – सीए – ९२८८ शरदनगर येथून चोरून नेली आहे. वाहन चोरीच्या आठव्या गुन्ह्यात गुरविंदरसिंग दर्शनसिंग सैनी ( वय ३९, रा. हैद्राबाद, तेलंगणा) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सैनी यांनी एमएच – १४ – डीवाय ५४६३ ही दुचाकी मित्राच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. तिथून चोरट्यांनी चोरून नेली. वाहन चोरीच्या नवव्या गुन्ह्यात सदानंद दत्तात्रय भोरे (वय ६२, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भोरे यांची दुचाकी किन्हई गावातील धरणाजवळून चोरट्यांनी चोरुन नेली.