- अभिनेते सयाजी शिंदे यांचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२०) :- ”एक देश मागे गेला म्हणजे या देशातील शेतकरी मागे गेला” असा डायलॉग मारीत मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोरदार बॅटिंग करीत देशात गेल्या २८ दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निमा संघटनेच्या पदाधिका-यांसह आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. निमा संघटनेसाठी दिलेला भूखंड ज्यावर शेकडो वृक्ष लावलेली आहेत तो भूखंड महापालिकेचा असताना एमआयडीसीने परस्पर विक्री केलेला आहे. तो भूखंड परत निमा संघटनेला मिळावा व तेथे वृक्ष संवर्धन व्हावे, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली.
त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, धनंजय शेडबाले, तुषार शिंदे, नगरसेविका अनुराधा गोरखे तसेच निमा संघटनेचे डॉ. महेश पाटील, डॉ तांबिले व सर्व डॉक्टर पदाधिकारी उपस्थित होते. आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शेतकरी पुढे गेला तरच देश पुढे गेला हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे”, असेही सयाजी शिंदे म्हणाले.














