- पोलिसांनी कारवाईत केला छत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२०) :- दोन विविध कारवायांमध्ये पोलिसांनी विदेशी सिगारेटसह तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा असा एकूण ३६ लाख ७९ हजार ९१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने चाकण व वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी ही कारवाई केली.
दलपत पत्ताराम भाटी (रा. थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा ताथवडे येथे भाड्याच्या खोलीत गुटखा साठवून ठेवत, चारचाकी वाहनातून त्याची वाहतूक करून विक्री करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी १५ लाख १५ हजार ६९२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत रामाराम करनाराम जाट (वय २४), ओमप्रकाश विरमाराम विष्णोई (दोघे रा. खालब्रे), दिनेश भवरलाल भाटी (वय २४), मांगिलाल लख्खाराम चौधरी (वय २२, दोघे रा. चिंचवड) यांच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालुंब्रे (ता. खेड) येथील आरोपीच्या किराणा दुकानातून पोलिसांनी पाच लाख ७७ हजार नऊ रुपये किमतीचा गुटखा, ७२ हजार २१५ रुपयांची रोकड, १६ लाख ५० हजार रुपये किमतीची तीन चारचाकी वाहने जप्त केली आहेत.














