- रुग्णालय पुढील आठवड्यात होणार शंभर टक्के नॉन कोविड रुग्णांसाठी खुले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२०) :- संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पन्नास टक्के कोविड आहे. रुग्णालय शंभर टक्के नॉन कोविड रुग्णालय करण्यात यावे, असे आदेश स्थायी समितीने प्रशासनास दिले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात वायसीएम नॉन कोविड होणार आहे.
पिंपरी – चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मार्च महिन्यापासून वायसीएम रुग्णालय कोविड सर्मपित रुग्णालय केले. दिवाळीपूर्वी कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहे. हर्डीकर यांनी रुग्णालयातील पन्नास टक्के भाग नॉन कोविड केला होता. त्यानंतर डिसेंबर महिन्यात रुग्णांची रुग्ण संख्या कमी झाली आहे. दाखल रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालय शंभर टक्के नॉन कोविड करावे, यावर सभेत चर्चा करण्यात आली.
त्यानंतर अध्यक्षांनी आदेश प्रशासनास दिले आहेत. डिसेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालय शंभर टक्के नॉन कोविड करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे.