न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२०) :- भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेेंटरमध्ये फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष व परिषद सदस्य सतीश काळोखे यांच्या उपस्थितीत क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या सन २०२१ ते २०२३ कालावधीसाठी १२ परिषद सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. त्यात डॉ. रजनी इंदुलकर यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. इंदुलकर यांनी सचिवपदी डॉ. अजय फुलंबरकर व कोषाध्यक्षपदी संजीव शिंदे यांची निवड केली. पुणे शाखेच्या परीषद सदस्यपदी रावसाहेब सुर्यवंशी, प्रकाश यार्दी, माधव बोरवणकर, अनंत क्षीरसागर, सुरेंद्र वायकर, अरुण आडीवरेकर, कु. परवीन तरफदार आणि भूपेश माल यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित परिषदेच्या सदस्यांची यावेळी चंद्रहास रानडे, धनंजय वाघोलीकर यांची परिषदेचे स्वीकृत सदस्यपदी निवडले. निवडणूक अधिकारी म्हणून चंद्रशेखर रुमाले यांनी काम पाहिले.