- पालिकेकडून हेल्पलाईन क्रमांक जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२०) :- इंग्लंडमधील काही भागात कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्ट्रेन आढळला असून या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात २५ नोव्हेंबर २०२० ते २३ डिसेंबर २०२० या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभागाकडून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जे कोणी २५ नोव्हेंबर २०२० नंतर इंग्लंड वरुन पिंपरी चिंचवड शहरामध्ये आले आहेत त्यांनी स्वत:हून व त्यांच्या सोसायटीच्या चेअरमन / अध्यक्ष यांनी आपल्या नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयामध्ये संपर्क साधावा.
यासाठी खालीलप्रमाणे रुग्णालय प्रमुख यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच याकामी पिंपरी चिचवड महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ वर संपर्क करावा व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला या सर्वेक्षणाबाबत सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नागरिकांना केले आहे.











