ख्रिचन बांधवांनी नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२०) :- कोविड -१९ या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व प्रसार टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सजगतेने व सतर्क राहून नाताळ सण साजरा करण्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निर्गमित केले आहेत.
या अनुषंगाने व्यापक लोकहीताच्या दृष्टीने आणि नागरिकांना अधिक सजग राहत सणाचा आनंद घेता यावा. यासाठी जारी करण्यात येत असलेले आदेश खालिलप्रमाणे निर्गमित केले आहेत.
१) ख्रिचन बांधवांनी या वर्षांचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा.
२) नाताळ सणानिमित्ताने चर्चमध्ये जास्तित जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे, चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामायिक अंतर राखले जाईल याची काळजी घेण्यात यावी.
३) चर्चमध्ये निर्जतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, तसेच मास्क व सेनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
४) नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये येशूच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अगर अशी वस्तू ठेवल्या जातात, त्या ठीकानी सामाजीक अंतर पाळणे गरजेचे आहे.
५) चर्यमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Cher) गाण्यासाठी जास्तीत जास्त १० गायकांचा (Chatisters) समावेश करण्यात यावा. यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करून सामाजीक अंतराने पालन करण्यात यावे.
६) परिसरात दुकाने/स्टोल लावण्यात येऊ नयेत.
७) फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. प्रदुषणासंदर्भात नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात यावे.
८) कोविड – १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच पि. चि. मनपा, पोलिस यांनी विहित केलेल्या नियमांचे कोटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील.
९) नाताळ उत्सव सुरु होण्यामधल्या कालावधीत काही सुचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.











