- आपत्कालीन परिस्थिती व जमाव नियंत्रणासाठी होणार मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या वतीने ३ मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन्स्चे (MSV) पिंपरी चिंचवड पोलिस पोलिस आयुक्तालयास हस्तांतर करण्यात आले. अतिरीक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) राजेंद्र सिंग यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन समारंभ पार पडला.
यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त सुधिर हिरेमठ, उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी सभापती ज्ञानेश्वर लोंढे, मनसे गटनेते सचिन चिखले, निळकंठ पोमण आदी उपस्थित होते.
या ३ मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन्स् (MSV) पोलिसांच्या गरजेनुसार बनविल्या असून यात PTZ कॅमेरा (३६० Degree), ४ व्हेईकल HD कॅमेरा, ८ पोर्टेबल वायरलेस HD कॅमेरा, २ ऑपरेटर, व्हिडिओ मॅनेजमेंट सॉफ्टवेअर १२ कॅमेरासाठी, एसी. आणि जनरेटर सेट, १ आठवठ्याची व्हिडोओ साठविण्याची क्षमता, १ लॅपटॉप, ५५ इंच LED टिव्ही, मिटिंग रुम, वाहनांसाठी LED लाईटस् (१२० Degree), ४ स्पिकर व सायरन, दंगल प्रतिबंधक उपकरणे, युपीएस स्ट्रेचर, फ्रस्टेड बॉक्स आणि फायर एक्स्टेंग्चर या सुविधांचा समावेश आहे.
आषाढी व कार्तिकी वारी,आळंदी व देहुयात्रा, मोहरम, गणेशोत्सव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, संप, निवडणुक बंदोबस्त, सार्वजनिक सण, आपतकालिन परिस्थिती जमाव नियंत्रण आदी पोलिस खात्यासाठी यांचा उपयोग होणार आहे.
हे वाहन अशोक लेलँड यां कंपनीचे उत्पादित असून Mistral, Bangalore या कंपनीमार्फत आवश्यक बदल करुन घेणेत आलेले आहेत. अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा पोलिस दलासाठी उपलब्ध करुन देणेत आलेली आहे. पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी शहरातील पदाधिका-यांचे आभार मानुन या वाहनांचा उपयोग शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व वेगवेगळ्या आपतकालिन परिस्थितीमध्ये होईल असे सांगितले आहे.