न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. २४ डिसेंबर) रोजी १४८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेला एक ६५ वर्षीय पुरुष रुग्ण हा रावेत येथील रहिवासी आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९५८५० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२३९१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७४२ जणांचा मृत्यू झालेला आहे.