- तब्बल १३ वाहनांची केली तोडफोड; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२०) :- चिखलीतील घरकुल येथे बुधवारी रात्री सायटीच्या बिल्डिंगच्याखाली आरोपी हातात कोयता घेऊन दहशत पसरवित होता. ‘आता मीच घरकुलचा डॉन आहे, माझ्या नादी लागला तर त्याला खल्लास करीन’, अशी धमकी देत होता. तसेच तो सोसायटीतील गाड्या फोडत होता.
त्याने सहा दुचाकी, तीन तीनचाकी आणि चार चारचाकी, अशी एकूण १३ वाहनाची तोडफोड करून ४४ हजार ५०० रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी आकाश बालाजी गायकवाड (वय २९, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नुरमहोम्मद ऊर्फ गुल्लू हमीद सय्यद (वय १८, रा. घरकुल, चिखली), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चिखली पोलिस पुढील तपास करीत आहेत.