न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२०) :- महापालिका परिसरातील प्राधिकरण परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. रावेत, थेरगाव, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, चिखली, काळेवाडी, थेरगाव, रहाटणी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत.
अनधिकृत बांधकामांविरोधात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्यावतीने गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू झाली आहे. १२ जणांवर फौजदारी दाखल केली आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे मुख्याधिकारी बन्सी गवळी यांनी दिली. चिंचवड, आकुर्डी येथील पोलीस ठाण्यात १२ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.