- भोसरीतील घटना; पत्नीवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२०) :- जेवण वाढण्यावरून झालेल्या वादात पत्नीने पतीला लोखंडी सळईने मारहाण केली. यात पतीच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला आणि मनगटाला दुखापत होऊन हाड मोडले. याप्रकरणी सत्यशिला प्रकाश मठपती (रा. शिवशंकर कॉलनी, भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रकाश महारुद्रप्पा मठपती (वय ६१) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १७ डिसेंबरला घडली. घटनेच्या दिवशी फिर्यादी फेरफटका मारून रात्री दहाला घरी परतले. त्यांनी पत्नीला जेवण वाढण्यास सांगितले. त्यावरून झालेल्या वादात पत्नीने पतीला मारहाण केली.